पिंपरी : गेली तीन वर्षे 'तो' तिला फसवतच राहिला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

गेल्या तीन वर्षांपासून निगडीसह विविध ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी : गेल्या तीन वर्षांपासून निगडीसह विविध ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 
या प्रकरणी पीडित मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ तुकाराम हतारगे (वय 27, रा. हंडराळ, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ऑगस्ट 2017 ते मार्च 2020 या कालावधीत ही घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधित मुलीची हतारगे याच्यासमवेत 2017 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. त्याने तिला ऑगस्ट 2017 मध्ये खूप महत्त्वाचे काम आहे, असे सांगून निगडी येथील एका लॉजमध्ये बोलाविले. तेथे एका रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर डांगे चौक, वाकड, आळंदी, जेजुरी, हिंजवडी, शिवाजीनगर रेल्वेस्थानक अशा ठिकाणी बलात्कार केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचप्रमाणे आळंदी येथे बोलावून कोणीही नातलग नसताना मंदिरात लग्न केले. तेथून काही दिवस तिला जेजुरी येथे ठेवले. तेथे दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने हिंजवडी येथे राहण्यास आले. तेथे आल्यावर ती गर्भवती राहिली. त्यानंतर गर्भपात करण्याच्या मुद्यावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस हतारगे तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून शिवाजीनगर रेल्वेस्थानक येथे गेला. त्यावेळी फिर्यादी तरुणीही त्याच्या मागोमाग गेली असता त्यावेळी तिचा गर्भपात झाला.

फिर्यादी त्यावेळी अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही तिच्याशी शरीरसंबंध ठेवून गर्भपात घडवून आणल्याबद्दलही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आता ही मुलगी कायद्याने सज्ञान झाली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges filed against youth for rape