Joy Street Event
sakal
पिंपरी - प्रत्येक जण मोबाईलला जास्त महत्त्व देत आहे. नोटिफिकेशन्स, इन्स्टाग्राम अपडेट, कॉल्समध्ये अडकतोय. आपल्याभोवतीचे शहर वेगाने धावत आहे. मुलांसह आजी-आजोबांशी मनमोकळ्या गप्पा, आनंदोत्सव, शेजाऱ्यांशी आपुलकी, असे क्षण दुर्मीळ होत आहेत. यातून मार्ग काढत पूर्वीचे क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी चऱ्होलीमध्ये ‘सकाळ’ येत्या रविवारी (ता. १४) घेऊन येत आहे, ‘सकाळ’चे काही सोनेरी तास अर्थात जॉय स्ट्रीट आनंदाची नवीन वाट.