पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक'ची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

भाऊ म्हाळसकर
Thursday, 10 December 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कुसगाव, लोणावळा ते खालापूरदरम्यान 'मिसिंग लिंक'वरील नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी केली.

लोणावळा (पुणे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कुसगाव, लोणावळा ते खालापूरदरम्यान 'मिसिंग लिंक'वरील नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी केली. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक आदींसह पदाधिकारी, कार्य़कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुसगाव येथील प्रकल्प कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन मार्गिकेची गुरुवारी (ता. १०) पाहणी केली. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी कुसगाव ते खालापूरदरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे द्रुतगती मार्गालगत ओझर्डे येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. ठाकरे यांनी ओझर्डे येथे अपघातग्रस्तांसाठी आपातकालीन उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. 

काय आहे 'मिसिंग लिंक'चा प्रकल्प

  • मिसिंग लिंक प्रकल्प हा खोपोली एक्झिट, खालापूर ते कुसगाव बु. लोणावळा हा एकूण १९ किलोमीटरचा प्रस्तावित मार्ग
  • प्रकल्पाची अंदाजित एकूण रक्कम साडेसहा हजार कोटी रुपये
  • प्रकल्पअंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत ९०० मीटर व ६५० मीटरचे दोन 'केबल स्टेड' दरीपूल
  • ८.९२ किमी व १.७५ किमी अंतराचे दोन सर्वांत मोठे बोगदे
  • द्रुतगती मार्गावरील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार 
  • एकूण प्रकल्पाचे आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण
  • प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत
  • प्रकल्पावर आतापर्यंत अंदाजे ७०० कोटींचा खर्च झालाय.
  • प्रकल्पांतर्गत पुणे-मुंबई मार्गावरील सर्वांत मोठ्या बोगद्यातील मार्गिकेचे दोन किमी, तर मुंबई-पुणे मार्गिकेचे दीड किमी काम झाले आहे
  • बोरघाटातील दरीपुलाचे काम वेगात सुरू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray inspects 'Missing Link' on Pune-Mumbai Expressway