Chikhali News : चिखलीतील वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरणचा पुढाकार, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि केबल बदलण्याची कामे होणार

MSEDCL Approves New Switching Station in Chikhali with Rs 75 Crore Funding : चिखली परिसरातील वाढती विजेची मागणी आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने ७५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. नेवाळे वस्ती येथे नवीन स्विच स्टेशन उभारण्यात येणार आहे.
MSEDCL Approves New Switching Station in Chikhali with Rs 75 Crore Funding

MSEDCL Approves New Switching Station in Chikhali with Rs 75 Crore Funding

esakal

Updated on: 

चिखली : चिखली परिसरातील विजेची वाढती मागणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महावितरणकडून नेवाळे वस्ती येथे नवीन स्विच स्टेशनसह अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून चिखली परिसराला अधून-मधून खंडित वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. त्यापार्श्वभूमीवर नगरसेवक विकास साने यांच्याकडून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जात होता. त्याला अखेर यश आले असून महावितरणकडून चिखली परिसरात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...