
पिंपरी, ता. १६: चिंचवडमधील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली.