Chinchwad and Bhosari Assembly Electionsakal
पिंपरी-चिंचवड
Chinchwad and Bhosari Assembly Election : चिंचवड, भोसरीत सगेसोयऱ्यांची कसोटी; उमेदवारांसह कार्यकर्तेही एकमेकांचे नातेवाईक
विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात दुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. मात्र, त्यांचे उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत.
पिंपरी - विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात दुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. मात्र, त्यांचे उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे नातेगोते आणि सगेसोयऱ्यांभोवती निवडणूक फिरू लागली असून, त्यांची ‘कसोटी’ लागणार आहे.
