चिंचवड : बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, कामगाराचा मृत्यू

पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव
चिंचवड : बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, कामगाराचा मृत्यू

पिंपरी : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रोड येथे इमारतीचा काही भाग कोसळला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला. कामगार, त्याची पत्नी व दोन मुले बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना ही घटना घडली असून याबाबत माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Chinchwad Building Collapse)

वाल्हेकरवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या दरम्यान, इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकला होता. अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना कामगाराचा मृत्यू झाला. धरमराज (वय ३८ वर्षे) असे या कामगाराचे नाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com