Chinchwad By-Election : सहानुभूती वेगळी अन्…; उमेदवारीनंतर राष्ट्रवादीच्या नाना काटेंचं मोठं विधान

Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics
Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics

Chinchwad By-Election Update : पुणे विधानसभा पोटनिवडणूकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आज या या निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यादरम्यान भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.

सर्वांनी एकमुखाने मागणी केली होती, त्यानंतर आता जयंत पाटील, अजित पवार यांनी ट्विट करत उमेदवारी जाहीर करत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्याचे काटे यांनी यावेळी सांगितले.

चिंचवड मतदार संघातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. यानंतर आता राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार जाहीर केला आहे. यादरम्यान

जगताप यांच्या निधनामुळे भाजपला नागरिकांच्या सहाणुभूतीचा फायदा होईल आणि मविआला ही निवडणूक जड जाईल का? या बद्दल विचारले असता काटे म्हणाले की, दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्याबद्द आम्हाला देखील सहाणुभूतीचा होती. आदरणीय लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवारांनी सांत्वन केलं. परंतु सहाणुभूतीचा भाग वेगळी आणि राजकारण वेगळं असल्याचे काटे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागे जो विकास पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूकीत पुढे जाणार असल्याचे काटे यावेळी म्हणाले.

Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics
Gautam Adani Net Worth : अदानी नऊ दिवसांत निम्म्यावर; बसला 9.5 लाख कोटींचा झटका

गटबाजी होण्याची शक्यता नाही. कारण आम्ही सर्वजणांची दहा-अकरा जणांपैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी आमची एकमुखाने मागणी होती असेही काटे यावेळी म्हणाले.राहुल कलाटे यांची बंडखोरी होऊ शकते का यावर बोलताना काटे म्हणाले की मविआचा एकमेव उमेदवार आहे आणि या निवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. तसेच त्यांनी उमेदवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार देखील मानले.

Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics
Kasba Peth By-Election : 'आता नंबर बापटांचा का…?'; कसब्यात भाजपच्या उमेदवारीवरून झळकले पोस्टर

पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics
Turkey Earthquake : तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहाकार; 3400 हून अधिक मृत्यू; भारतातून NDRF टीम रवाना

सोमवारी दिवंगत लक्ष्मण जगताप पत्नी अश्विनी जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर अर्ज पडताळणीमध्ये अश्विनी जगताप यांचा अर्ज बाद होवू नये म्हणून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणुक अटीतटीची होणार असं दिसत आहे. दरम्यान आजच नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com