Chinchwad By Election : "कोणालाही उमेदवारी द्या पण; कलाटे यांना नको" राष्ट्रवादीला तिरंगी लढत भोवली

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांच्या विजयात तिरंगी लढतीबरोबरच सहानुभूतीचाही वाटा
Chinchwad By Election ashwini jagtap
Chinchwad By Election ashwini jagtapsakal
Updated on
Summary

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांच्या विजयात तिरंगी लढतीबरोबरच सहानुभूतीचाही वाटा

- जयंत जाधव

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांच्या विजयात तिरंगी लढतीबरोबरच सहानुभूतीचाही वाटा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात बारकाईने घातलेले लक्ष भाजपच्या यशास लाभदायक ठरले.

Chinchwad By Election ashwini jagtap
Chinchwad By Election: कलाटेंना उभं करण्यामागे राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी; फडणवीसांनी सांगितली Side Story

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे होत असलेली ही पोटनिवडणूक सुरवातीस बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न झाले. परंतु; महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिरंगी लढत झाली.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी राहुल कलाटे यांचेही नाव महाविकास आघाडीकडे प्रामुख्याने घेतले जात होते. कलाटे हे २०१४ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत होते. कलाटे हे २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष लढले होते.

Chinchwad By Election ashwini jagtap
Eknath Shinde : Kasaba Chinchwad Bypoll Election result वर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

परंतु; त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना यांच्यासह वंचित बहुजन आघाडी यांचा पाठिंबा होता. कलाटे यांना महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला सुटते की राष्ट्रवादीला मिळते याचा अंदाज नव्हता.

त्यामुळे ते दोन्ही पक्षांच्या संपर्कात होते. कलाटे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीकडे १० जण इच्छुक होते. या १० जणांनी आमच्यापैकी कोणालाही द्या पण; कलाटे यांना उमेदवारी नको, अशी भूमिका घेतली.

Chinchwad By Election ashwini jagtap
Chinchwad Bypoll Election Results : Ashiwini Jagtap विजयानंतर भावूक | Pune News

त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी (ता. ६ फेब्रुवारी) कलाटे यांच्याबाबत पहाटेपर्यंत चर्चा करून, अजित पवार यांनी ऐनवेळी दुसऱ्या दिवशी (ता. ७ फेब्रुवारी) सकाळी जयंत पाटील यांना नाना काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यास सांगितली.

शिंदे-फडणवीस यांचे योगदान राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सर्व गोष्टी बारकाईने माहीत आहेत.

त्यामुळे अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी तळ ठोकून बसणे यात फारसे वावगे नव्हते पण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे तीन वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी येऊन, घेतलेली गुप्त बैठक असो की ‘रोड शो’ करून घेतलेली सभा असो, हा चर्चेचा मुद्दा ठरला.

Chinchwad By Election ashwini jagtap
Kasba Bypoll Result : NCP Prashant Jagtap यांचा Ravindra Dhangekar विजयाचा दावा | Pune

त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनापासून ते ‘तिरंगी’ लढत घडवून आणण्यापर्यंत बारकाईने लक्ष होते. शिंदे व फडणवीस यामध्ये यशस्वी ठरल्यामुळेच ही तिरंगी लढत भाजपच्या पथ्यावर पडली.

शंकर जगताप यांचा प्रचारात सहभाग भाजपमध्येही नाट्यमयरीत्या अश्‍विनी जगताप यांचे नाव पुढे आले. त्याअगोदर लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजप चिंचवड विधानसभेचे प्रमुख शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर होते.

मात्र, कुटुंबामध्ये एकमत करण्यात फडणवीस यशस्वी ठरले. शंकर जगताप यांनी प्रचारात हिरिरीने घेतलेल्या सहभागामुळे आमच्यात कौटुंबिक वाद नव्हता, हे सिद्ध झाले. या सर्व गोष्टींमुळे अश्‍विनी जगताप यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com