
पिंपरी : चिंचवडमधील एम्पायर इस्टेट पुलाखालून निगडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असंख्य खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. पण, ते दोन-तीन पावसांतच उखडले आहे.