उधार न दिल्याने चायनीज सेंटरची तोडफोड; बोपखेलमधील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

चायनीज उधार न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत चायनीज सेंटरसह एका कार्यालयाची कोयत्याने तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बोपखेल येथे घडला.

पिंपरी - चायनीज उधार न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत चायनीज सेंटरसह एका कार्यालयाची कोयत्याने तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बोपखेल येथे घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमनाथ तोंडीलकर, पपी उर्फ मनोज शिर्के (दोघेही रा. बोपखेलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश अभिमन्यू वाघमारे (रा. रामनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे गणेशनगर येथे चायनीज सेंटर आहे. बुधवारी (ता. 20) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चायनीज उधार मागितले असता फिर्यादीने त्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांचा मित्र विकास नारायण उजागरे यांना शिवीगाळ व मारहाण करीत कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी चायनीज सेंटरवर येऊन कोयत्याने तोडफोड केली. तसेच महेंद्र वाघमारे यांच्या कार्यालयाचेही कोयत्याने नुकसान केले. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Center Damage Credit Crime

Tags
टॉपिकस
Topic Tags: