मोशीमध्ये 'जनता कर्फ्यू'ला हरताळ, रविवारप्रमाणेच आजचं चित्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

परिसरातील स्विट मार्ट, हार्डवेअर आदी विविध व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडी ठेवत जनता कर्फ्यूला हरताळ फासत आपले दैनंदिन व्यवहार सुरुच ठेवल्याचे दिसून आले. 

मोशी (पिंपरी-चिंचवड) : परिसरातील स्विट मार्ट, हार्डवेअर आदी विविध व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडी ठेवत जनता कर्फ्यूला हरताळ फासत आपले दैनंदिन व्यवहार सुरुच ठेवल्याचे दिसून आले. 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा बसावा म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दर गुरुवारी व रविवारी कडक जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याकडे मोशी गावठाणसह प्राधिकरण परिसरात अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, स्विट मार्ट, हार्डवेअर, किराणा दुकाने, दारुची दुकाने सुरुच होती. तसेच, खासगी वाहनचालक, दुचाकीस्वार आपापल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर पुणे-नाशिक महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येत होते. राजा शिवछत्रपती चौकातील विविध स्विट मार्टमध्ये नागरिकांनी खाद्यपदार्थ खाण्यासाठी सोशल डिस्टन्स न पाळता व तोंडावर मास्क न लावता गर्दी केली होती.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांमध्ये सध्या दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक आहे. मात्र, मोशी उपनगरातील पुणे-नाशिक महामार्ग, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, स्पाईन रस्ता आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. मुख्य चौकातील भाजी मंडई, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, जय गणेश साम्राज्य व्यापारी संकुल, स्पाईन व्यापारी संकुल आदी ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरुच ठेवले होते. त्यामुळे मोशीतील जनता कर्फ्यूला मागील रविवारप्रमाणेच गुरुवारीही संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे निदर्शनास आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्यासाठी सर्व दुकाने, भाजी मंडई, पेट्रोल पंप, अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनाही बंदमध्ये सहभागी केले, तरच चांगला प्रतिसाद मिळेल, असे काही स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens not compliance to janta curfew in moshi