
पिंपरी : महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत (डीपी) विविध भागातील बाधित जागा मालकांनी आक्षेप नोंदविले आहेत. असंख्य मालमत्ताबाधित होत असल्याने डीपी रद्द करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (ता. ७) महापालिकेवर मोर्चा काढला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.