esakal | सिनेमागृह झाले बंद तरी हार मानली नाही! उच्चशिक्षित जोडप्याने शोधला पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

With the closure of cinema hall people have to find alternatives for subsistence

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातले सिनेमागृह तब्बल सहा महिन्यांपासून बंद आहेत. या चकचकीत सिनेमागृहांमध्ये वाहनतळ कर्मचाऱ्यांपासून ते पडद्यापर्यंत काम करणाऱ्या युवकांच्या हाताला काम उरले नाही. सिनेमागृह सुरु होण्याची वाट पाहत बसणाऱ्यांनी सध्या ठिकठिकाणी मिळेल ते काम व व्यवसाय सुरु केला आहे.

सिनेमागृह झाले बंद तरी हार मानली नाही! उच्चशिक्षित जोडप्याने शोधला पर्याय

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : मी सिनेमागृहात सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला होतो. तीन मोठ्या सिनेमागृहांमध्ये मुंबई व पुणे येथे काम केले. लॉकडाउननंतर सिनेमागृह सुुरु होण्याची वाट पाहिली. परंतु संसर्ग परिस्थितीमुळे सिनेमागृह सुरु होणे अवघड वाटते. इतके दिवस स्वस्थ बसून चालणार नाही. म्हणून नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या घरी पूजेसाठी नेमक्‍या कोणत्या सुगंधित साहित्याचा वापर केला जातो हे पाहिले. उदबत्त्या व धूपची मला पहिल्यापासूनच आवड आहे. याच व्यवसायाकडे वाटचाल करण्याचे ठरविले. भाविकांना घरात प्रसन्न व आल्हाददायक वातावरण हवे असते, त्या दृष्टीने मी विक्रीवर भर दिला. सोशल मीडियावर फोटो शेअर करून नागरीकांना उदबत्ती व धूपची माहिती देतो. कोणत्याही ग्राहकाला शहराच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरवितो. सध्या कुटुंब व मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरळीत होऊन उदबत्ती व्यवसायात जम बसल्याचे कासारवाडीतील विश्‍वनाथ पुरुषोत्तम गावडे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातले सिनेमागृह तब्बल सहा महिन्यांपासून बंद आहेत. या चकचकीत सिनेमागृहांमध्ये वाहनतळ कर्मचाऱ्यांपासून ते पडद्यापर्यंत काम करणाऱ्या युवकांच्या हाताला काम उरले नाही. सिनेमागृह सुरु होण्याची वाट पाहत बसणाऱ्यांनी सध्या ठिकठिकाणी मिळेल ते काम व व्यवसाय सुरु केला आहे. पार्किंग कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, बॉक्‍स ऑफिस, कॅफे फूड काऊंटर, डोअर किपर, फ्लोअर मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, सिनेमा मॅनेजर अशा विविध पदांवर काम करणारे सध्या बेरोजगार झाले आहेत.

या घटनेने मिळाला हुरुप
गणपती आगमनादिवशी मी केवळ दोन हजार रुपयांचा माल विक्रीसाठी भरला. त्याच दिवशी तो संपला. त्यामुळे काम करण्याचा हुरुप आला. ज्या दिवशी काम सुरु केले त्या दिवशी केवळ माझ्याकडे 2 हजार रुपये होते. वस्तू मांडण्यासाठी टेबलही नव्हता. व्यवसायासाठी गाळा भाडेतत्त्वावर घेऊन तो अधिक जोमाने सुरु करण्याचा विचार आहे. या व्यवसायातही आर्थिक वृद्धी आहे. केवळ मेहनतीची गरज आहे. एका ऑर्डरसाठी देखील मी कुठेही जातो. सध्या घरोघरी जाऊन मार्केटिंग करत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उदबत्ती व्यवसाय सुरु करुन एक महिना उलटला. मुलगा सार्थक व मुलगी नेत्रा दोघेही ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. खर्च आहे तितकाच आहे. सध्या व्यवसायात वाढ वृद्धी करण्याचा विचार सुरु आहे. पत्नी विधीचाही कामात हातभार लागतो. सध्या बाहेर काम मिळणे अवघड आहे. सिनेमागृहात असल्याने जबाबदारी काय असते व व्यवसायात मेहनत किती गरजेची असते हे मी शिकलो आहे. उदबत्ती व्यवसायामध्ये सध्या 12 प्रकारचे ब्रॅंड मी विकतो. त्यात मसाला व साधी अगरबत्तीला सर्वाधिक मागणी आहे. धूपमध्येही गुगळ, रामायणी, लोबान धूपला मागणी आहे. पूजेसाठी लागणारे जवळपास 12 ते 13 प्रकारचे साहित्य मी विकतो. मार्केटिंगचा अभ्यास केला आहे.
-विश्‍वनाथ गावडे, कासारवाडी, उदबत्ती विक्रेता

loading image
go to top