
पिंपरी : ‘‘उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करा. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी कोणतीही तडजोड करू नका,’’ अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सूचना केली. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, अशा वेळी उद्योजकांना त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.