मावळ : तळेगावात गुरुवारी संपूर्ण लॉकडाउन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

  • 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'मध्ये तपासणी 

तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानांतर्गत महासर्वेक्षण मोहिमेसाठी तळेगावात गुरुवारी (ता. 24) लॉकडाउन करण्याचा आदेश मावळ-मुळशीचे घटना व्यवस्थापक तथा उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी मंगळवारी (ता. 22) दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगावात सर्व नागरिकांचे एकाच दिवशी सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनुसार हे अभियान राबविण्यासाठी गुरुवारी (ता.24) तळेगावात सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. या दिवशी घरपोच दूध वितरण सकाळी सहा ते नऊपर्यंतच करता येईल. तसेच सर्व रुग्णालये, दवाखाने व मेडिकल, वैद्यकीय टेस्टिंग लॅब यांना वेळेचे कोणतेही बंधन नसेल. तळेगावात प्रवेश करणारे एन्ट्री व एक्‍झिट निश्‍चित करून इतर रस्ते बंद करावेत. तेथे चेकपोस्टची उभारण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. सर्वेक्षण करताना सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेशात म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, सोमवारी (ता. 21) झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत ही मोहीम आणि लॉकडाउनबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्याधिकारी रवी पवार यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि उपविभागीय अधिकारी शिर्के यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. 

आरोग्य तपासणी मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तपासणी करावी. खरी माहिती स्वयंसेवकांना देऊन सहकार्य करावे.
- सुनील शेळके, आमदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a complete lockdown in talegaon on thursday 24 september