
पिंपरी : कोरोना रोखण्यासाठी लढणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी, पोलिस अशा सर्व कोरोना योद्धांचे महापालिका सर्वसाधारण सभेत सोमवारी अभिनंदन करण्यात आले.
महापालिका सर्वसाधारण सभा महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी चार व्यक्तींच्या आसन असलेल्या सोफ्यावर केवळ दोनच सदस्यांची व्यवस्था केलेली आहे. सदस्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची व्यवस्था केलेली आहे. पक्षनेते नामदेव ढाके यांनी कोरोना योद्धांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यात केशव घोळवे, उषा मुंडे, झामाबाई बारणे, संतोष लोंढे, राजू बनसोडे, संगीता ताम्हाणे, अंबरनाथ कांबळे, संदीप वाघेरे, हर्षल ढोरे, राजेंद्र गावडे आदींनी सहभाग घेतला. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोण काय म्हणाले -
अजित गव्हाणे : कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी खासगी लॅबची मदत घ्यावी.
सुजाता पलांडे : वायसीएम व भोसरी रुग्णालयांतील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वच दवाखाने, रुग्णालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सवलती द्याव्यात
दत्ता साने : गरिबांसाठी कम्युनिटी किचन पुन्हा सुरू करावेत.
आशा शेडगे : स्वच्छता व घंटागाडी कर्मचाऱ्यांना पीपीई कीट किंवा सुरक्षा साधने पुरवावीत.
राहुल जाधव : कामगार, कष्टकऱ्यांना व शिधापत्रिका नसणाऱ्यांना अन्नधान्य किट द्यावे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.