
पिंपरी : एकेकाळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राज्य व देशातील पक्षीय राजकारणात शहरातील काँग्रेस नेत्यांचा दबदबा होता. परंतु, गेल्या काही वर्षांत काँग्रेसला घरघर लागली आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे निर्माण झालेल्या गटबाजीत कार्यकर्ते विखुरले गेले.