
कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पोलिस देणार आधार; मदतीसाठी करा संपर्क
पिंपरी - कोरोनाच्या संकटात (Corona Crisis) नागरिकांना (Citizens) भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसही (Police) सरसावले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवरील कारवाई (Crime) अधिक तीव्र करण्यासह कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार (Blackmarket) रोखण्यासाठी व कोरोनापीडित नागरिकांना तातडीने मदत (Help) मिळण्यासाठी पोलिसांकडून १५ मे पासून हेल्पलाईन (Helpline) सुरु केली जाणार आहे. या हेल्पलाइनवर नागरिक संपर्क (Contact) साधून तक्रार करण्यास मदतही मागू शकतात. (Contact the police for support to those who have been orphaned by Corona)
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून महासेतू सोल्युशन्स एलएलपी, ग्लोबल ह्युमन ऑर्गनायझेशन यांच्या समन्वयातून १५ मे पासून 'पोलिस सॅमरिटन' या नावाने हेल्पलाईन सुरु केली जाणार आहे. यावर कोरोनाबाधित रुग्ण समाजात वावरत असेल, सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करण्याबरोबरच मास्क न वापरणाऱ्यांबाबत तक्रार करू शकतात. यासह कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिकाचालक ठराविक दरापेक्षा जादा भाडे दर आकारत असेल, रेमडेसिव्हीर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार होत असल्यास, आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासासाठी बनावट प्रवास पास बनविणे, तसेच कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट बनवत असल्याचे निदर्शनास आल्यास हेल्पलाइनवर तक्रार करता येईल.
हेही वाचा: गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत चार मोटारी जळाल्या
यासह संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असल्याने होम क्वारंटाईन असल्यास त्यांना औषध, जेवण, भाजीपाला यांची व्यवस्था करणे. तसेच कोरोनामुळे अनाथ झाल्याने सांभाळ करण्यास कोणीही नसलेल्यांनाही पोलिसांकडून मदत केली जाणार आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
हे आहेत हेल्पलाईन क्रमांक
८०१०४३०००७
८०१०८१०००७
८०१०४६०००७
८०१०८३०००७
Web Title: Contact The Police For Support To Those Who Have Been Orphaned By
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..