PMP Bus : स्वमालकीपेक्षा ठेकेदार ‘सुसाट’; कोट्यवधींचा अतिरिक्त भार

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) २०२३-२४ ची संचलन तूट ७६६ कोटींवर गेली आहे.
PMP Bus
PMP Bussakal
Updated on

- अविनाश ढगे

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) २०२३-२४ ची संचलन तूट ७६६ कोटींवर गेली आहे. या आर्थिक वर्षात मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. यामुळे ‘पीएमपी’ला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याचे लेखापरीक्षण अहवालातून दिसत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दींसह लगतच्या ग्रामीण भागांत पीएमपी बससेवा सुरू आहे. रोज सुमारे १० ते १२ लाख नागरिक प्रवास करतात. मात्र, त्या बसमध्ये पीएमपीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे पीएमपीचे उत्पन्न घटले असून ठेकेदारांचे उत्पन्न वाढले आहे. यावरून बसचे नियोजन करताना ठेकेदारांच्या बस जास्तीत जास्त कशा धावतील यासाठीच अधिकारी प्रयत्न करत नाहीत ना? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

प्रतिकिलोमीटर दर

पीएमपीच्या ताफ्यात २०२३-२४ मध्ये भाडेतत्त्वावरील एक हजार ७१ बस होत्या. यात इलेक्ट्रिक ४५७ आणि सीएनजी ६१४ बस होत्या. ठेकेदारांना सीएनजी बससाठी प्रतिकिलोमीटर ७१ रुपये ७० पैसे आणि ई-बससाठी प्रतिकिलोमीटर ६२, ६४ आणि ६७ रुपये दिले जात आहेत.

असा आहे करार

पीएमपीने ठेकेदारांसमवेत केलेल्या भाडेकरारानुसार दररोज २०० किलोमीटरचे प्रतिकिलोमीटर दराप्रमाणे पैसे देण्यात येत आहेत. २०० किलोमीटरपेक्षा अधिक बस धावल्यास प्रतिकिलोमीटर ५० ते ७५ टक्के दर दिला जातो. उदाहरणार्थ - ६७ रुपये प्रतिकिलोमीटर दर असल्यास त्याच्या ७५ टक्के म्हणजेच ५० रुपये २५ पैसे ठेकेदाराला आणि १६ रुपये ५० पैसे पीएमपीला मिळतात.

ऑपरेशन पीएमपी

पुणे महापालिका परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) या मंडळांचे २००७ मध्ये विलीनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) अस्तित्वात आले आहे. त्या करारानुसार पीएमपीचा आर्थिक भार व संचलन निधी पुरवण्याची जबाबदारी दोन्ही महापालिकांची आहे. आज १८ वर्षे उलटूनही पीएमपीची ‘गाडी’ आर्थिक रुळावर आलेली नाही. त्याची कारणे शोधली असता आढळलेले वास्तव मांडण्याचा प्रयत्न आजपासून ‘ऑपरेशन पीएमपी’ वृत्तमालिकेतून केला आहे.

आणखी ४०० सीएनजी बस

पीएमपीने ऑक्टोबर २०२४ मध्ये श्री बालाजी रोडा लाईन्सच्या ९३ बस, वैष्णवी ट्रान्सपोर्टच्या ९३ बस, तिरुपती ट्रॅव्हल्स ॲण्ड गुडस् सर्व्हिसेसच्या ९३ बस आणि ॲन्टोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्सुशन्सच्या १२१ बस घेण्याचा भाडेकरार केला आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात मार्च अखेरपर्यंत ठेकेदारांच्या आणखी ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यांना ८२ रुपये ८९ पैसे प्रतिकिलोमीटर दर निश्चित केला आहे.

२०२२-२३ मध्येही ठेकेदारच पुढे

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २०२३-२४ प्रमाणे ठेकेदारांच्या बसची धावसंख्या पीएमपीच्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक होती. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात १२ कोटी ७९ लाख ९० हजार ७९१ किलोमीटर बस धावल्या आहेत. त्यात स्वमालीकच्या पाच कोटी ११ लाख ४५ हजार ८५७ आणि ठेकेदाराच्या बस सात कोटी ६८ लाख ४४ हजार ९३४ किलोमीटर धावल्या आहेत.

अधिकाऱ्यांकडून उत्तर नाही

पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. प्रतिक्रियेसाठी संदेशही दिला आहे. सर्व संदेश वाचल्याचे दिसते आहे. मात्र, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘माहिती घेऊन सांगतो’ असे उत्तर दिले. यावरून अधिकारी ठेकेदारांच्या बससंचालनाबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com