पीएमआरडीएमध्ये कोरोनाचा संसर्ग; अतिरिक्त आयुक्तांसह कर्मचारी पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवाX
Thursday, 17 September 2020

  • कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाबाबत संभ्रमावस्था 

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी व असिस्टंट टाऊन प्लॅनर, अभियांत्रिकी विभागाच्या अभियंता, अग्निशमन विभागाचे अधिकारी, अनधिकृत बांधकाम विभागाचे पोलिस क्वारंटाइन झाले आहेत. यातील बऱ्याच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएचे कामकाज सध्या पूर्णपणे बारगळले असून, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पीएमआरडीएने पुणे शिवाजीनगर सीईओपी, नेहरूनगर स्टेडिअम जम्बो कोविड सेंटरचे काम हाती घेतले होते. बरेच अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दिवस-रात्र कामात करीत होते. महापालिका व पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित कामाची जाबाबदारी पार पाडली. त्यानंतर चार ते पाच दिवसांतच सहा ते सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील बऱ्याच जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. कंत्राटी वर्ग कामावर आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्वारंटाइन होण्याची गरज असताना कर्मचारी कामावर येत आहेत. त्यासाठी योग्य त्या काटेकोर नियमावलीची गरज आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्मचारी गोंधळात...

लॉकडाउनच्या काळात तीस टक्के कर्मचारी कामावर बोलावले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन सुरू होते. बरेच जण घरून काम करत होते. मात्र, त्यानंतर पूर्ण क्षमतेने कर्मचारी कामावर आले. त्यामुळे एकमेकांसोबत संपर्क वाढला. एका विभागात पॉझिटिव्ह कर्मचारी सापडल्यास पूर्ण विभागच बंद करण्याची वेळ येत आहे. अद्यापही अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नेमकी सोशल डिस्टन्सिंगच्या कामकाजाची पद्धत व ताळमेळच दिसून येत नाही. विभागातील काही कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यास इतरांना कळविले जात नसल्याने दुसऱ्या विभागातील कर्मचारी भांबावून जात आहेत. आकुर्डी व औंध कार्यालयात संवाद होत नसल्याने ऑनलाइन कामकाजाबाबत संभ्रमावस्था आहे. नेमके क्वारंटाइन व्हायचे कोणी, कामावर किती जणांनी हजर राहायचे, याचा अद्यापही गोंधळच सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून आयुक्त ऑनलाइन काम करत आहेत ते कार्यालयात फिरकले नसल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection in pune metropolitan region development authority