पिंपरी-चिंचवड शहरात तृतीय पंथियांनाही कोरोना संसर्ग: एकुण बाधितांचा आकडा..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

शहरातील 61 हजार 660 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 7 हजार 337 रुग्ण सक्रिय आहेत. यात सहा हजार 134 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार 207 आहे. मात्र, त्यातील 967 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. 144 जण गंभीर असून 96 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील तीन तृतीय पंथियांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 70 हजार 902 झाली आहे. यात 40 हजार 989 पुरुष, 25 हजार 193 महिलांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील 61 हजार 660 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 7 हजार 337 रुग्ण सक्रिय आहेत. यात सहा हजार 134 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार 207 आहे. मात्र, त्यातील 967 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. 144 जण गंभीर असून 96 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

आज सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत 17 जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 755 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 145 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांमध्ये 40 हजार 791 पुरुष, 25 हजार 80 महिला व तीन तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत बारा वर्षांखालील पाच हजार 590 मुलांना संसर्ग झाला आहे. 13 ते 21 वयोगटातील पाच हजार 941 युवक, 22 ते 39 वयोगटातील 28 हजार 125 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 21 हजार 375 प्रौढ आणि साठ वर्षांवरील नऊ हजार 83 ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 48 हजार 507 जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 13 हजार 815 जण होम क्वारंटाइन आहेत.

 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection to three transgender in Pimpri-Chinchwad city