पिंपरी : कोरोनाबाधितांना घरकुलमध्ये ठेवण्यास स्थानिकांचा विरोध कायम

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

महापालिकेच्या वतीने चिखली येथील घरकुलमध्ये कोरोनाबाधित नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याला स्थानिक नागरिकांकडून विरोध कायम आहे. 

पिंपरी : महापालिकेच्या वतीने चिखली येथील घरकुलमध्ये कोरोनाबाधित नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याला स्थानिक नागरिकांकडून विरोध कायम आहे. 

कोरोनाबाधित नागरिकांना घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या इमारतींमध्ये सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. घरकुलच्या बाजूने या चार इमारतींना पत्रे लावण्यात आले आहेत. तसेच या चार इमारतींमध्ये कोरोनाबाधितांना आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे या रुग्णांचा घरकुलमधील नागरिकांशी संपर्क न होणे अपेक्षित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नागरिकांमध्ये अस्वस्थता 

घरकुलमध्ये कोरोना रुग्ण सापडला होते. त्यामुळे घरकुलमधील नागरिकांकडे अन्य नागरिक कोरोनाबाधित असल्यासारखेच बघतात. त्यामुळे मोकळ्या इमारतीत जरी महापालिकेने कोरोनाबाधितांना स्थलांतरित केले, तरी त्यामुळे घरकुलमधील कोणाच्या रोजगारावर गदा आल्यास अशा नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने मध्यस्थाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात घरकुल फेडरेशनचे संस्थापक अशोक मगर यांनी सांगितले, "आधीच कोरोना सुरू झाल्यापासून अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. घरकुलमधील नागरिकांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये घरकुलमधील नागरिकांना कामावर घेण्यास फारसे कोणी तयार होत नाही. त्यासाठी महापालिकेने संबंधित कंपन्यांना वस्तुस्थिती समजावून सांगावी.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients oppose by gharkul citizens