बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर दाखल होणार गुन्हे; पिंपरीत पालिका आयुक्तांचा इशारा

बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर दाखल होणार गुन्हे; पिंपरीत पालिका आयुक्तांचा इशारा

Published on

पिंपरी : होम आयसोलेशनमधील रुग्ण नियमांचा भंग करून घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा रुग्णांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी यांनी अशा रुग्णांवर लक्ष ठेवावे. अन्यथा संपूर्ण सोसायटी सील करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. सध्या कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात कडक उपाययोजना करण्याचा आदेश दिला. 

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व झोनल रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नियमांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुकानदारांवरही कारवाई 

दुकानांमध्ये नियमापेक्षा अधिक गर्दी आढळून आल्यास, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास दुकानधारकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित दुकान तत्काळ सील केले जाईल. शिवाय, त्या दुकानधारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित दुकानदाराने घ्यावी. 

मंडईत सम-विषम नियोजन करा 

भाजी मंडईमध्ये सम-विषम पद्धतीने मार्केट चालू ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची मार्केट असोसिएशनने दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. 

आयुक्त पाटील म्हणाले... 

- कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने शहरात विविध ठिकाणी ५० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत 
- सर्व ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजार असणाऱ्यांनी (४५ वर्ष वयावरील) लसीकरण करून घ्यावे 
- ‘मी जबाबदार’ ही मोहीम सरकारने सुरू केली आहे. या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी 
- मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियमांचे सर्वांनी पालन करावे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com