रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिला तपासणीचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

  • लक्षणे दिसताच तपासणीचा सल्ला 

पिंपरी : शहरात सध्या कोरोना संसर्ग कमी झाला आहे. पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. ते आणखी कमी करण्यासाठी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सणांच्या काळामध्ये कोरोना संसर्ग वाढला असल्याचे गेल्या आठ महिन्यांत आढळून आले आहे. आता दिवाळी काळातही बाजारपेठांमध्ये गर्दी होती. तसेच, अनेक नागरिक गावी गेले आहेत. ऋतुमानामध्येही बदल झाला आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. कोरोनाची तपासणीही करून घेणे सर्वांच्या दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे. कारण, लक्षणे आढळल्यानंतर त्वरित औषधोपचार केल्यास कोरोना आटोक्‍यात येऊ शकतो. मात्र, अनेक जण, त्रास जास्त वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे त्यांना ऑक्‍सिजन व प्रसंगी व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासते. अशा वेळी धोका वाढण्याची शक्‍यता असते, असे सांगून आयुक्त हर्डीकर म्हणाले, "शहरातील 35 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नसेल. पण, आपण काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय यंत्रणा सज्ज 
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाट होती. सर्वाधिक रुग्ण या कालावधीत आढळले आहेत. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण कमी होत गेले आहे. सुरक्षितता म्हणून आपण आयसीयू व ऑक्‍सिजन यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patients in pimpri chinchwad up to ten percent