

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याचे आदेश कायम असल्याने यावर्षी आषाढी एकादशी साधेपणाने साजरी करण्यात आली. परिणामी शहरातील अनेक मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच दर्शन रांग पहायला मिळाली नाही. भाविकांची गर्दी नव्हती. मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पहाटे महापूजा, अभिषेक करण्यात आला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आकुर्डी विठ्ठलवाडी, एच. ए. कंपनी कार्नर, भोसरी, वडमुखवाडी, मासुळकर कॉलनी या परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साधेपणाने साजरी केली. आकुर्डीतील विठ्ठलवाडी मंदिराच्या प्रवेशद्वाराला जाळी लावण्यात आली होती. मंदिराच्या दर्शनीभागात भाविकांच्या दर्शनासाठी पादुका ठेवण्यात आल्याने भाविकांनी त्याचे मुखदर्शन घेतले.
पहाटे पाच वाजता विश्वस्त गोपाळराव कुटे यांनी महापूजा केली. काकड आरती, हरिपाठ घेतल्याची माहिती गिरीश कुटे यांनी दिली. मासुळकर कॉलनीतील विठ्ठल मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पहाटे साडेपाच वाजता विशाल मासुळकर यांनी सपत्नीक आरती केली. मंदिराला विद्युत रोषणाईने सजावट केली होती.
यंदा कोविड 19च्या दहशतीमुळे शाळांच्या दिंडी काढल्या नाहीत. भाविकांना प्रदक्षिणा घालता आल्या नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून अनेकांनी सकाळीच व्हॉटसऍप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून एकमेंकाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आले, यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्र तयार केली होती.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यंदा फुलविक्रेत्यांना विठ्ठल पावलाच नाही- दरवर्षी आषाढी एकादशीला आकुर्डीतील विठ्ठल मंदिरासमोर 30 ते 35 फुले व पूजा साहित्य विक्रेत्यांची गर्दी असते. खरेदीसाठी भाविकांची अगदी रस्त्यापर्यंत रांगा लागलेल्या असतात, परंतु यंदा कोरोनामुळे मंदिराबाहेर फुल विक्रेत्यांची जागा ओस पडली होती. एकच फूल विक्रेत्या महिला शशिकला आबनावे पूजा साहित्य विक्रीस बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, ""दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो रुपयांची कमाई होती. परंतु आज सकाळपासून बसून आहे, केवळ 100 रुपयांचे पूजासाहित्य विकले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.