Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 163 जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 108 रुग्ण आढळले. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 108 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 940 झाली आहे. आज 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 207 झाली आहे. सध्या एक हजार 912 सक्रिय रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 821 आणि बाहेरील 767 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत आठ हजार 756 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 582 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 330 रुग्ण होम आयसोलेट आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील 394 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 274 जणांची तपासणी केली. 813 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 18 हजार 451 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज 688 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 520 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 582 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. 742 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत सहा लाख 27 हजार 231 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 25 हजार 911 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 23 हजार आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष चिंबळी (वय 40) येथील रहिवासी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 108 new cases found

Tags
टॉपिकस
Topic Tags: