esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 148 नवे रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 148 नवे रुग्ण 

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 148 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 850 झाली आहे. आज 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 148 नवे रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 148 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 850 झाली आहे. आज 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 92 हजार 391 झाली आहे. सध्या एक हजार 717 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 742 झाली आहे, तर शहराबाहेरील 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 705 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 12 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 843 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 46 जणांची तपासणी करण्यात आली. आज 721 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 82 हजार 245 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष रावेत (वय 65) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज एक हजार 795 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दोन हजार 240 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज रुग्णालयातून एक हजार 745 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 606 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत पाच लाख 36 हजार 592 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 39 हजार 136 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 32 हजार 686 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(Edited by Shivnandan Baviskar)