esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 159 नवे रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 159 नवे रुग्ण 

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापेक्षा अर्थात दुसऱ्या पंधरवाड्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेची शक्‍यता व्यक्त केली जात असून, ती रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 159 नवे रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 159 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 855 झाली आहे. आज 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 384 झाली आहे. सध्या एक हजार 880 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच आणि बाहेरील एक, अशा सहा जणांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 591 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 657 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष मोशी (वय 46), रुपीनगर (वय 88), भोसरी (वय 80) सांगवी (वय 72) आणि महिला वाकड (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेली शहराबाहेरील महिला मंचर (वय 32) येथील रहिवासी आहेत. 

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 736 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 144 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 134 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 985 रुग्ण बरे झाले आहेत. 

अजित पवारांनी साधला भाजपवर पिंपरीमध्ये थेट निशाणा

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 573 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात पाच हजार 280 जणांची तपासणी करण्यात आली. आज 401 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 76 हजार 374 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

दिवाळीनंतर शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे एका रुग्णामागे दहा जणांची तपासणी केली जात असल्याने रोजचे तपासणीचे प्रमाणही वाढलेले आहे. सध्या वायसीएम रुग्णालय अन्य आजाराच्या रुग्णांसाठीही खुले केले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात आणि ऑटोक्‍लस्टर येथे महापालिकेने उभारलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात दाखल केले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापेक्षा अर्थात दुसऱ्या पंधरवाड्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेची शक्‍यता व्यक्त केली जात असून, ती रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळेच सोमवारपासून (ता. 23) सुरू होणाऱ्या शहरातील शाळा पुन्हा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा अर्थात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आदेश शुक्रवारी (ता. 20) आयुक्तांनी दिला होता. मात्र, वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन शुक्रवारच्या आदेशात सुधारणा करून 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

loading image