Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 171 नवीन रुग्ण 

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 171 नवीन रुग्ण 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (ता. 17) 171 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 94 हजार 948 झाली आहे. आज 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 609 झाली आहे. सध्या एक हजार 613 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 726 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 710 झाली आहे.  आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष थेरगाव ( वय 52) व महिला चिंचवड (वय 51) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 714 रुग्ण उपचार घेत आहेत. 899 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील 912 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 323 जणांची तपासणी करण्यात आली. आज 511 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 77 हजार 679 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com