esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज २५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये आज २५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी २५३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख पाच हजार ९५७ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज २५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी २५३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख पाच हजार ९५७ झाली आहे. आज २९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ६८४ झाली आहे. सध्या तीन हजार ४२३ सक्रिय रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या आठ दिवसांत खासगी रुग्णातयांत मृत्यू झालेल्या सात जणांची नोंद सोमवारी महापालिकेकडे झाली. आजपर्यंत शहरातील एक हजार ८५० आणि बाहेरील ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २३ हजार ३७१ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार १४१ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार २८२ रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील ६६६ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार ९६३ जणांची तपासणी केली. ८७० जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख ३६ हजार ९८१ जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

आज १९०३ संशयित रुग्णालयात दाखल झाले. दोन हजार ६७० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ३२२ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. ११४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत सहा लाख ६४ हजार ५१८ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ५८ हजार २३९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ५८ हजार ७४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 

loading image
go to top