
आज 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 149 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 88 झाली आहे. आज 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 511 झाली आहे. सध्या एक हजार 921 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 656 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 680 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष पिंपरी (वय 72, 55), भोसरी (वय 56), चिंचवड (वय 81), निगडी (वय 59) व महिला भोसरी (वय 70), चिंचवड (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष आंबेगाव (वय 54), आळंदी (वय 40) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या महापालिका रुग्णालयांत 854 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 921 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 263 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 258 जणांची तपासणी करण्यात आली. आज 498 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 72 हजार 106 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.