Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात 183 नवीन रुग्ण 

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात 183 नवीन रुग्ण 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 183 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 38 झाली आहे. आज 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 461 झाली आहे. सध्या एक हजार 981 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच आणि बाहेरील पाच, अशा दहा जणांचा मृत्यू झाला. 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 596 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 661 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष आकुर्डी (वय 57), थेरगाव (वय 84), भोसरी (वय 52) आणि महिला चिंचवड (वय 73), थेरगाव (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेली शहराबाहेरील पुरुष खेड (वय 74), सोलापूर (वय 80), नारायणगाव (वय 59), पारनेर (वय 81) आणि महिला जुन्नर (वय 50) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 781 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 200 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 137 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 989 रुग्ण बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 600 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात पाच हजार 446 जणांची तपासणी करण्यात आली. आज 421 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 76 हजार 795 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com