esakal | पिंपरी शहरात कोरोना प्रतिबंधक लस संपली; आजअखेर २,०८,७९५ नागरिकांना लस
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

शहरातील नागरिकांना देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस गुरुवारी संपली.

पिंपरी शहरात कोरोना प्रतिबंधक लस संपली; आजअखेर २,०८,७९५ नागरिकांना लस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील नागरिकांना देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस गुरुवारी संपली. आता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील भांडार विभागात एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे नागरिकांना परत पाठविले. लसीचा साठा येईपर्यंत लसीकरण केंद्रेही बंद ठेवावी लागणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे. महापालिकेतर्फे १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नोंदणीकृत आरोग्य सेवा देणारे, फ्रंन्ट लाईन वर्कर आणि ४५ वर्षावरील व्यक्तींना लस दिली जात आहे. महापालिकेने ५८ आणि २९ खासगी लसीकरण केंद्रावर आजअखेर २ लाख ८ हजार ७९५ नागरिकांचे लसीकरण केले आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीत लसीकरण केंद्रांवरही लसीचा तुटवडा जाणवत आहे. बुधवारी भांडार विभागातील लस संपली. महापालिकेकडून लसच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, एवढेच सांगितले जाते. किती डोस आहेत, साठा किती दिवस पुरेल, किती केंद्रे बंद केली आहेत, याविषयीची अधिकृत माहिती महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांना देता आली नाही.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज आठच हजार आल्या असून त्याचे लसीकरण सुरू आहे. लस मिळण्यासाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तांशी महापालिका आयुक्तांनी चर्चा केली आहे. राज्याला केंद्राकडून लस कमी आल्या आहेत, असे कळाले आहे. जास्तीत जास्त लस मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आणि उद्या थोडे कमी लसीकरण होईल. पण, जे आहे ते व्यवस्थित होत आहे. जेवढ्या लस दिल्यात त्या संपल्यानंतर तात्पुरते लशीकरण थांबले आहे. तिथे दुसऱ्या दिवशी लसीकरण होईल. 
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

loading image