esakal | मावळात कोरोनाचा प्रभाव होतोय कमी; आज दिवसभरात केवळ २१ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात कोरोनाचा प्रभाव होतोय कमी; आज दिवसभरात केवळ २१ रुग्ण

मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्याचे गेल्या काही दिवसातील रुग्ण संख्येवरून स्पष्ट होत आहे.

मावळात कोरोनाचा प्रभाव होतोय कमी; आज दिवसभरात केवळ २१ रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्याचे गेल्या काही दिवसातील रुग्ण संख्येवरून स्पष्ट होत आहे. रविवारी (ता. १८) दिवसभरात २१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी (ता. १७) २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५९३ झाली आहे. आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला असून, ५ हजार ११५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक सहा, लोणावळा, वरसोली व वराळे येथील प्रत्येकी तीन, सोमाटणे येथील दोन, वडगाव, तळेगाव दाभाडे ग्रामीण, कुसगाव बुद्रुक व गहुंजे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ५९३ झाली असून, त्यात ४१८ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये २०४ लक्षणे असलेले, तर २१६ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २०४ जणांपैकी १७२ जणांमध्ये सौम्य व ३१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. एक जण गंभीर आहे. सध्या सक्रिय असलेल्या ४१८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.