
चीनच्या वुहान शहरातून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची भीती अजूनही कमी झालेली नाही. वर्षभरानंतरही आपली दहशत कायम ठेवणाऱ्या विषाणूनं आपल्याला खूप काही शिकवलंय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानं आपल्या सोबतच्या माणसांपासूनही खबरदारी घ्यायला शिकवलं.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची भीती अजूनही कमी झालेली नाही. वर्षभरानंतरही आपली दहशत कायम ठेवणाऱ्या विषाणूनं आपल्याला खूप काही शिकवलंय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानं आपल्या सोबतच्या माणसांपासूनही खबरदारी घ्यायला शिकवलं. त्यातून आपण सावरत आहोत. पुढच्या काही दिवसांत आपण 100 टक्के या संकटातून बाहेरही पडू. पण या काळात निर्माण झालेली परिस्थिती भविष्यकाळातही निवळणार नाही. संकटाच्या काळात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या ज्यामुळे ऊर्जा नेमकी कशी असावी, याची प्रचिती आली. पिंपरीतील विलास सोनवणे हा अवलिया यांपैकी एक उदाहरण ठरला.
देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर राज्यातील पुणे-मुंबई कोरोनाचं केंद्र बनलं होतं. याच काळात विलास सोनवणे यांचे संपूर्ण कुटुंबिय कोरोनाच्या जाळ्यात अडकले. विलासही त्याला अपवाद राहिले नाहीत. योग्य ती खबरादारी आणि सरकारी नियमावलीचे पालन करत सुदैवाने सोनवणे कुटुंबिय यातून बाहेर पडले. याच काळात कोरोनातून बरे झालेल्या मंडळींकडून प्लाझ्मा दान करण्याची मागणी वाढली. ज्याला कोरोना झाला आहे त्याच्या अँटिबॉडीज दुसऱ्या कोरोनाग्रस्ताला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरत होत्या. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन करण्यात येत होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे मनात निर्माण झालेल्या दहशतीनंतर प्लाझ्मा डोनेट करायला पुढे सरसावणे हे धाडसाचेच काम होते. हे धाडस विलास यांनी करुन दाखवले. सामाजिक भान जपण्यासाठी त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर 18 दिवसांनंतर त्यांनी पुन्हा प्लाझ्मा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय गाठले. यासंदर्भात विलास सोनवणे यांनी सकाळ ऑनलाईनशी खास मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या.
पिंपरी-चिंचवडकरांनो मास्क घालूनच बाहेर पडा; नाही तर दंड!
ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा प्लाझ्मा डोनेट केला. 18 दिवसांनी पुन्हा या प्रक्रियेला सामोरे गेलो. गड-किल्ले, ट्रॅकिंग आणि व्यायाम यामुळे शरीर तंदुरुस्त होते. त्यामुळेच कदाचित संकटातून सावरुन प्लाझ्मा दान करण्यासाठी बळ मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्लाझ्मा दान केल्यामुळे अशक्तपणा येतो, असा घरच्यांचा समज होता. त्यांचा प्लाझ्मा दान करण्याला विरोध होता. त्यामुळे मला त्यांना न सांगताच ही गोष्ट करावी, लागली, असेही त्यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil