लोणावळ्यात १५ दिवसात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करणार

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातील एकही रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी आमदार सुनिल शेळके प्रयत्नशील आहेत.
Sunil Shelake
Sunil ShelakeSakal

लोणावळा - कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातील एकही रुग्ण उपचाराविना (Treartment) राहू नये यासाठी आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelake) प्रयत्नशील आहेत. तुंगार्ली येथील लोणावळा (Lonavala) नगरपरिषदेच्या स्वा. सावरकर विद्यालयात अवघ्या १५ दिवसात ५० ऑक्सिजन बेडची (Oxygen Bed) सुविधा (Convenience) असलेले सुसज्ज कोविड सेंटर (Covid Center) सुरू करणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आमदार शेळके यांच्याकडे मागणी केली होती. (Covid center with 50 oxygen beds will be started in 15 days in Lonavla MLA Sunil Shelake)

नगरसेवकांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार शेळके यांनी आज मंगळवारी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करत इमारतीची रंगरंगोटी, स्वच्छता, लाईट फिटिंग, दुरुस्ती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पायर्‍यांची डागडुजी व कोरोना रुग्णांसाठी गरजेचे असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्या अशी सूचना लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना केली. पायाभूत सुविधा उपलब्ध होताच ५० ऑक्सिजन बेडचे राज्यशासनाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Sunil Shelake
गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत चार मोटारी जळाल्या

कोरोना मुक्त मावळसाठी सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकहिताच्या ज्या सूचना असतील, त्या पूर्ण करण्यासाठी मी बांधील असून ती माझी नैतिक जबाबदारी आहे, असे यावेळी शेळके म्हणाले.

याप्रसंगी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, कर अधीक्षक शिवाजी मेमाने, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेस शहराध्यक्ष विलास बडेकर, नगरसेवक भरत हारपुडे, शिवदास पिल्ले, गौरी मावकर, कल्पना आखाडे, सेजल परमार, सिंधू परदेशी, शादान चौधरी, मुकेश परमार, भूषण पाळेकर, अजिंक्य कुटे, अविनाश ढमढरे, धनंजय काळोखे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com