मोशीत गौणखनिजाची चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

अवैधरित्या खाणीतून गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी : अवैधरित्या खाणीतून गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश किसन जाधव (वय 22, रा. लक्ष्मीनगर, मोशी) व रवी हिरण्णा राठोड (वय 37, रा. मोहननगर, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मंडल अधिकारी जयश्री महेश कवडे (रा. सिद्धी टॉवर, दापोडी) यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याने गुरूवारी (ता. 2) सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी यांचे पथक मोशीतील वखार महामंडळामार्गे मोशीतील खाण परिसरात पोहोचले असता आरोपींनी त्यांच्याकडील एका ट्रॅक्‍टरमध्ये एक ब्रास, तसेच दुसऱ्या ट्रॅक्‍टरमधून दीड ब्रास दगड चोरी करून घेऊन जात असताना आढळून आले. दरम्यान, फिर्यादी यांच्या पथकाने सर्व माल जप्त करून भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against two persons for stealing secondary minerals in Moshi

Tags
टॉपिकस
Topic Tags: