आयटी इंजिनियर पत्नीचा गळा आवळून खून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news IT engineer wife Murder by strangulation Asking her husband why he drunk  pimpri

आयटी इंजिनियर पत्नीचा गळा आवळून खून...

पिंपरी : दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारल्याने झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना हिंजवडीजवळील माणगाव येथे घडली. अवंतिका शिवम पचौरी उर्फ भारद्वाज (वय ३०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय ३२, रा. आय ट्रेन सोसायटी, फेज दोन, माणगाव, हिंजवडी, मूळ- उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. रंजनकुमार लाडलीमोहन शर्मा (रा. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

शिवम व अवंतिका हे दोघेही हिंजवडी आयटी पार्क मध्ये आयटी इंजिनियर आहेत. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, आरोपी पती दारू पिऊन घरी आल्याने पत्नी अवंतिका यांनी त्याला जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यामध्ये शिवम याने त्याची मुलगी व पत्नी अवंतिका यांना लथाबुक्क्यांनी मारहाण केली. अवंतिका यांचा गळा आवळून डोके भिंतीवर आपटले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून उपनिरीक्षक महेंद्र गाढवे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime News It Engineer Wife Murder By Strangulation Asking Her Husband Why He Drunk Pimpri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top