आसामहून पोटापाण्यासाठी पिंपरीत आलेल्या कामगाराचा खून; औद्योगिक नगरी हादरली

Crime News, Pimpari
Crime News, Pimpari

पिंपरी : डोक्यात कठीण वस्तूने मारुन एका कामगाराची हत्या  करण्यात आली. तळवडे येथे ही घटना घडली आहे. जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा. आसाम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी राहुल ज्ञानेश्वर भालेकर (वय 38, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

जीवन शर्मा हे फिर्यादी राहुल भालेकर यांच्याकडे कामाला होते. भालेकर यांची त्रिवेणीनगर तळवडे येथे पेईंग गेस्ट (पीजी) इमारत आहे. त्या इमारतीच्या देखभालीचे काम फिर्यादी यांनी शर्मा यांना दिले होते. गुरुवारी (ता.17) रात्री साडेआठच्या सुमारास शर्मा नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्री अज्ञात व्यक्तीने कठीण वस्तूने शर्मा यांच्या डोक्यात मारले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शर्मा यांचा मृत्यू झाला. 

शुक्रवारी (ता.19) सायंकाळी फिर्यादी भालेकर यांना शर्मा त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे समजले. भालेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com