Crime News : पिंपरी-चिंचवडमधील दिवसभराचे क्राईम अपडेट्स

Crime News : पिंपरी-चिंचवडमधील दिवसभराचे क्राईम अपडेट्स

एफडीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करणारे जेरबंद 

अन्न व औषध विभागाचे (एफडीआय) अधिकारी असल्याची बतावणी करीत बेकरीचालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. कारवाई न करण्यासाठी पावती किंवा पैशांची सेटलमेंट करण्यास सांगणाऱ्या चौघांना चिखली पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई तळवडे येथे करण्यात आली. रणजित धोंडीबाराव भोसले (चऱ्होली फाटा, आळंदी रोड), संजय श्रीशैल मल्लाड (वय 34, रा. सेक्‍टर क्रमांक 4/28/7 ए, मोशी प्राधिकरण), राम नारायण सुर्वे (वय 50, रा. शिवतेजनगर, सेक्‍टर क्रमांक 18, चिखली), प्रदीप देवराम मालकर (वय 36, रा. अष्टविनायक सोसायटी, रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे तळवडे येथील एका बेकरीत आले. त्यांच्याकडे एफडीआय कोणतेही पद नसताना कारवाई करण्यासाठी आलो असल्याचे खोटे सांगितले. बेकरीतील काउंटरवरील व्यक्ती फैजल हनीफ अन्सारी यांना आरोपींनी फूड ऍण्ड ड्रग्ज डिपार्टमेंटकडून आल्याचे भासविले. ब्रेड पॅकेटवर तारीख टाकलेली नाही व बेकरीतील काही पदार्थ पॅकबंद नाहीत असे सांगून आरोपींनी त्यांना भीती घातली. दरम्यान, कारवाई न करण्यासाठी पावती किंवा पैशांची सेटलमेंट करण्यास सांगितले. 

काळेवाडीत पर्स हिसकावली 

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेकडील पर्स हिसकाविल्याची घटना काळेवाडी येथे भरदिवसा घडली. रश्‍मी राजेंद्र पालांडे (रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी विजयनगर येथील रस्त्याने जात असताना दुचाकीवरून दोघे त्यांच्याजवळ आले. त्यातील मागे बसलेल्या आरोपीने फिर्यादीच्या हातातील पर्स हिसकावली. त्यातील मोबाईल व रोख रक्कम असा आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटला. 

सांगवीत वाळू चोरी करणारे अटकेत 

नदीपात्रातील वाळूची चोरी केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई औंध येथे करण्यात आली. विजयकुमार छक्कम साव (वय 22), वैभव बारकू बारहाते (वय 23, दोघेही रा. टाकळी हाजी, शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैशाली जयंत पाटकर (रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी औंध येथील एसटीपी प्लॅंटच्यामागील राम नदीपात्रात व मुळा नदीतील संगम पात्रात आरोपी हे पोकलेनच्या साह्याने वाळू उपसा करीत होते. त्यांनी ट्रॅक्‍टरमधून आठ हजार रुपये किमतीची वाळू चोरली. पात्रात खड्डे करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चऱ्होलीत एकाला बेदम मारहाण 

उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला लोखंडी पाइपने बेदम मारहाण केल्याची घटना चऱ्होलीत घडली. सुनील कोंडिबा मुंगसे (वय 40, रा. चऱ्होली बुद्रूक) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित पठारे, अजय परांडे (दोघेही रा. चऱ्होली), विक्रम ठाकूर (रा. सोळुगाव) व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल आहे. आरोपी पठारे याने फिर्यादीला फोन करून उसने दोन हजार रुपये मागितले होते. मात्र, फिर्यादीने नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी चऱ्होलीतील दाभाडेवस्ती येथील त्यांच्या नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी विक्रम ठाकूर याने फिर्यादीला हॉटेलबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर चार आरोपींनी मिळून फिर्यादीला लोखंडी पाइप व लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

चिंचवडमध्ये एक लाखाची घरफोडी 

दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने एक लाखाचे दागिने लंपास केले. ही घटना चिंचवड येथे घडली. गोकूळ बबन पानसरे (रा. शनी मंदिराजवळ, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना अनोळखी चोरटा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरला. घरातील एक लाख तीन हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com