मावळात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला दोन हजारांचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी दिवसभरात ३८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला. लोणावळा येथील ५६ वर्षीय, तळेगाव दाभाडे येथील ६८ वर्षीय व ६६ वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दोन हजार एक, तर मृतांची संख्या ८० झाली आहे. एक हजार ४०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३८ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १२, कामशेत येथील सात, वडगाव येथील चार, टाकवे, वराळे व कान्हे येथील प्रत्येकी दोन; तर लोणावळा, इंदोरी, सोमाटणे, शिरगाव, साते, ब्राम्हणवाडी (बौर), कशाळ, लोहगड व शिंदगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार एक झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ६८, तर ग्रामीण भागातील ९३३ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ६८९, लोणावळा येथे २४७, तर वडगाव येथे रुग्णसंख्या १३२ एवढी आहे. आतापपर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ४०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी ११ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात सध्या ५१२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३२६ जण लक्षणे असलेले, तर १८६ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३२६ जणांपैकी २३२ जणांमध्ये सौम्य, तर ७८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ५१२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crossed two thousand corona patients in maval