esakal | दापोडीत 'ऑल सोल्स डे'निमित्त ख्रिश्‍चन दफनभूमीत गर्दी 
sakal

बोलून बातमी शोधा

दापोडीत 'ऑल सोल्स डे'निमित्त ख्रिश्‍चन दफनभूमीत गर्दी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 'ऑल सोल्स डे'निमित्त पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सर्व ख्रिश्‍चन दफनभूमीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत ख्रिस्ती बांधवांनी दापोडी दफनभूमीत गर्दी केली.

दापोडीत 'ऑल सोल्स डे'निमित्त ख्रिश्‍चन दफनभूमीत गर्दी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 'ऑल सोल्स डे'निमित्त पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सर्व ख्रिश्‍चन दफनभूमीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत ख्रिस्ती बांधवांनी दापोडी दफनभूमीत गर्दी केली. सायंकाळी दापोडी आणि पिंपरी लिंकरोड या दफनभूमीमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फुले, अगरबत्ती व मेणबत्ती लावून नैवेद्य दाखविण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दोन नोव्हेंबर हा "ऑल सोल्स डे' (सर्व आत्म्यांचा दिवस) म्हणून साजरा केला जातो. पूर्वजांचा स्मरणोत्सव, आत्मादिन किंवा स्मरणदिन, असेही या दिवसाला संबोधले जाते. ख्रिश्‍चन बांधव आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी सायंकाळी दापोडी आणि पिंपरी लिंक रोड या दफनभूमीमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फुले, अगरबत्ती व मेणबत्ती लावून आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात. याप्रसंगी पास्टर व फादर उपस्थित राहून प्रार्थनाही करतात. तसेच, सामूहिक प्रार्थना करण्यात येते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी होणारी गर्दी पाहता दापोडी सेमिट्रीने 'आत्मा दिन' कार्यक्रम रद्द केला होता. दरम्यान, सेमिट्रीची साफसफाई ट्रस्ट करून घेईल, त्यासाठी कोणीही आत येऊ नये. जी व्यक्ती आत येण्यास जबरदस्ती करतील, अशांवर पोलिस कार्यवाही करण्यात येईल, असा सूचना फलक गेट लावला आहे, तरीही समाजबांधवांनी गर्दी केल्यामुळे आपापल्या जबाबदारीवर पूर्वजांवर फुले वाहण्यास परवानगी दिल्याचे युआयसीसी दापोडी ट्रस्टचे काळजीवाहू विल्यम गजभीव यांनी सांगितले.