esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय मॉर्निंग वॉकसाठी गर्दी 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय मॉर्निंग वॉकसाठी गर्दी 
  • भल्या पहाटेच प्रमुख तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते गजबजताहेत 

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय मॉर्निंग वॉकसाठी गर्दी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, सायकलिंग, जॉगिंग बंद होते. दिवाळी झाली आणि गुलाबी थंडी हळूहळू जाणवू लागली आहे. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी व आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नागरिक सकाळी फिरण्यास, व्यायामासाठी नागरिक भल्या पहाटे घराबाहेर पडू लागले आहेत. कोरोनाची दहशत बाजूला सारून "मॉर्निंग वॉक'साठी शहरातील सर्वच प्रमुख तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते गजबजल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बदलत्या जीवन शैलीमुळे फिरणे हे आता सुदृढ आरोग्यासाठी गरज निर्माण झाली आहे. हिवाळ्यात सकाळी फिरायला जाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते. म्हणूनच अनलॉकनंतर सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शहराच्या चारही बाजूंचे रस्ते सकाळी माणसांनी फुलून गेलेले असतात. मानसिक आजारांना आळा घालण्याच्या हेतूने बहुतेकांनी मॉर्निंग वॉक'चा आधार घेतल्यामुळे घोरवडेश्‍वर, चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर, पिंपळे सौदागरचे लिनीयर गार्डन, नाशिक फाट्यावरील भारतरत्न जे. आर. डी टाटा उड्डाणपूल, रावेतचा बास्केट पूल, एम्पायर इस्टेटचा मदर तेरेसा उड्डाणपूल, मासूळकर कॉलनीतील टेल्को मैदान, आयुक्त बंगला मोरवाडी, काळेवाडी बीआरटी मार्ग अशा विविध भागांत नागरिक घराबाहेर फिरण्यासाठी येत आहेत. सुरक्षित वावरण्याचा नियम पाळून, चेहऱ्यावर मास्क बांधून नागरिक वॉकिंग करीत आहेत. काही जण योगासने करीत होते. विविध भागांत रस्त्यांवरही अनेक जण सायकलिंगचा आनंद लुटताना दिसून आले. 

दुर्गाटेकडी नऊ महिन्यानंतर गजबजली 

लॉकडाउनमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून निगडीतील दुर्गाटेकडी परिसरात शुकशुकाट होता. पण आता परिसर पहाटे पुन्हा एकदा गजबजला आहे. निसर्गरम्य परिसरात असंख्य नागरिक रोज सकाळी फिरण्यासाठी येतात. रोज पहाटेपासूनच या परिसरात गर्दी असते. 

उद्यानात वाढतेय गर्दी 

लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही उद्याने बंदच होती. पण आता हळूहळू उद्यानातही मॉर्निंग वॉकसाठी, जॉगिंगसाठी लोकांची संख्या वाढत आहे. लहान मुलांचे उद्यानात येण्याचे प्रमाण नगण्य आहे. पण मुख्य रस्त्यांवरून फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिक वैयक्तिक व्यायाम, जॉगिंग, ओपन जीम व जॉगिंग ट्रॅकचा वापरही होत आहे. 

पेयांची विक्री करण्याचीही हजेरी 

अगदी न चुकता मैदानांवर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यांना व्यायामानंतर लगेच ज्यूस किंवा नारळ पाणी किंवा विविध पेय घेण्याची सवय असल्याने विक्री करण्याचीही गर्दी दिसून यायची. पण "लॉकडाउन'मुळे मैदानातील व्यायाम थांबला आणि ज्यूस विक्रेतेही गायब झाले. आता 'अनलॉक'नंतर विक्रेत्यांची गर्दी होताना दिसून आली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या नऊ महिन्यांपासून घरातच होतो. घरातच "वॉकिंग' करून आरोग्याची काळजी घेत होतो. आता "ग्राउंड'वर "मॉर्निंग वॉक'ची संधी बऱ्याच महिन्यानंतर मिळाली आहे. 
- गोविंद शिंदे, मोरवाडी 

लॉकडाऊन'मुळे नऊ महिने "वॉकिंग' बंद होती. आता फिरण्यासाठी परवानगी दिल्याने मोकळ्या हवेत श्‍वास घेत तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू केला आहे. 
- विकी सिन्हा, मासूळकर कॉलनी 

व्यायाम, मॉर्निंग वॉक'साठी परवानगी मिळाल्याने आनंदी आहे. "मॉर्निंग वॉक', योगासने करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. रस्त्यावरच फिरून वॉकचा आनंद वेगळाच आहे. 
- मनीषा जैन, ऑटो क्‍लस्टर, चिंचवड