
अमोल शित्रे
पिंपरी : शहराच्या विविध भागांत क्युलेक्स प्रजातीच्या डासांचा उपद्रव वाढला आहे. हा डास चावल्यास हत्तीरोग होण्याची दाट शक्यता आहे. या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. आठ दिवस उलटून गेले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप औषध फवारणी केली नाही.