Cyber Police : ऑनलाइन फसवणुकीत वाढ; शंका घ्या, खात्री करा अन् फसवणूक टाळा. अन्यथा...

जवळची व्यक्ती अडचणीत आहे, तिला आर्थिक मदतीची गरज आहे, असा फोन अथवा मेसेज आला किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट आली, तर वेळीच सावध व्हा!
Cyber Police
Cyber Police esakal

Pimpri News - ‘गाडी भाड्याने द्यायची आहे?, तुमची वैयक्तिक माहिती व प्रक्रिया शुल्क पाठवा’. ‘... कामाचे टास्क पूर्ण करा, चांगले कमिशन देतो’. ‘फॉरेन करन्सीची ट्रेडिंग करा, गुंतवणूक करून मोठा नफा कमवा’, अशा स्वरूपाचा फोन, मेसेज किंवा ई-मेल अनेकांना येत आहेत. बाजारभावापेक्षा स्वस्तात सुकामेवा वा किमती वस्तू ऑनलाइन मिळत आहेत.

जवळची व्यक्ती अडचणीत आहे, तिला आर्थिक मदतीची गरज आहे, असा फोन अथवा मेसेज आला किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट आली, तर वेळीच सावध व्हा! अशा प्रकारांबाबत शंका घ्या. खात्री करा. विश्वासार्हता पटली तरच व्यवहार करा.

अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. गेल्या दोन दिवसांत पोलिसांकडे अशा फसवणुकीचे पाच प्रकार दाखल झाले आहेत. त्यात लाखो रुपयांची झळ सर्वसामान्य व्यक्तींना बसली आहे.

Cyber Police
Jalgaon Cyber Crime : विद्यार्थिनीचे मॉर्फिंग फोटो व्हायरल करुन बदनामी

प्रकार १

चिंबळीतील आशिष बनारसे यांना ७८३६८४४८३८ या क्रमांकावरून अमित शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. मोटार भाडेतत्त्वावर देण्याचा बहाणा केला. व्हॉटसॲपवर http://shriramcarrental.in// ही लिंक पाठवली. त्यात वैयक्तिक माहिती व क्रेडिट कार्डची माहिती भरून १५० रुपये भरायला सांगितले. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून ४३ हजार रुपयांचा व्यवहार करून फसवणूक केली.

Cyber Police
Nashik Cyber Crime: गुंतवणुकीच्या आमिषाने 6 लाखांची फसवणूक

प्रकार २

चिखलीतील बाबासाहेब वाळुंज यांना एका महिलेने येस बॅंकेचे शर्मा ट्रॅव्हल्सचे बॅंक खाते क्रमांक ०६७९८९४०००००५६३ व आयसीआयसीआय बॅंकेचा खाते क्रमांक ६९७३०५६०२१६४ यांचे आयएफसी कोड पाठविले. प्रकाश पाटील (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याने बी टु ट्रेडर्सचा चालू खाते क्रमांक ०२३२६१९०००००९९६ पाठवला. त्यांनी कामाचा टास्क देऊन वाळुंज यांना चांगले कमिशन देतो, असे सांगून वेळोवेळी सात लाख १४ हजार ६२८ रुपये घेतले. सुरुवातीला कमिशन देऊन विश्वास संपादन करून फसवणूक केली.

शंका घ्या, खात्री करा अन् फसवणूक टाळा

प्रकार ३

परकीय चलनाच्या ट्रेडिंगमधून नफा देण्याचे सांगून इशांत चोप्रा याने हिंजवडी येथील मदन कोरे यांचा विश्वास संपादन केला. www.mind-vise.com या संकेतस्थळावर लॉगिन आयडी तयार करून दिला. वेळोवेळी नफा दाखवून आयसीआयसीआय बॅंक खाते क्रमांक ०००४०१६९६६५९ यामधील बॅंकिंग ॲप व आरटीजीएसद्वारे सेंट्रल बॅंक खाते क्रमांक ५४१४३४८६४५, ॲक्सिस बॅंक खाते क्रमांक ०२९२१०१७६३२०, ०२९२१०१७९७८९, ०२९२१०१८१७४९ यावर वेळोवेळी परकीय चलन ट्रेडिंगसाठी ९२ लाख २९ हजार ३०५ रुपये गुंतवण्यास सांगितले. नफ्याची रक्कम मिळण्यासाठी प्रथम टॅक्स भरण्यासाठी आणखी पाच लाख रुपये मागून फसवणूक केली.

प्रकार ४

बिजलीनगर येथील महिलेला ७७२२८२१३२३ आणि ४४६११०७२०१ या मोबाईल क्रमांकधारकांनी ऑनलाइन मिक्स ड्रायफ्रुटस खरेदी करण्याचे आमिष दाखवले. बनावट लिंक पाठवण्याचा बहाणा करून पैसे देण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करून डिमार्ट रेडी या ऑनलाइन ॲप कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि बनावट लिंक पाठवून ५० हजार रुपयांची फसवणूक केली.

Cyber Police
Cyber Crime : पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला; 439 बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली

फसवणुकीचे फंडे...

टेलिग्रामवर फ्रिगेम टास्क देणे

व्हॉटस्ॲप छायाचित्र व नाव वापरून लोकांना पैसे मागणे

लष्करात आहे, बदली झालीय, साहित्य विकायचंय सांगून

तुमच्या नावाने कुरिअर पाठविले आहे, त्यात ड्रग्ज आहेत, पोलिसांशी संपर्क करा, असे सांगून घाबरवणे

न्यायालयाची नोटीस तुम्हाला आलेली आहे असे सांगून

काय करावे, काय करू नये...

अनोळखी व्यक्तींच्या लिंकला क्लिक करू नका

कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका

पैसे पाठविण्याच्या अगोदर खात्री करा

जो व्यवसाय करायचाय, तो कायदेशीर आहे का बघा

ज्या खात्यावर पैसे पाठवायचे, त्याचा व बोलणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ तपासा

सायबर गुन्हेगारी हे बिनचेहऱ्याचे जग आहे. फसवणूक होतेय, पण समोर कोणी दिसत नाही. त्यामुळे कशावरही विश्वास ठेवू नका. व्हॉटस्ॲपवर फोटो, नाव, आयडी कार्ड पाठवताहेत, त्याच्याशी काही संबंध नाही, असे बघा.

प्रत्येक व्यवहार संशय घेऊन केल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. विश्वास संपादन करून फसवणूक केली जाते. ती टाळण्यासाठी कशावरही विश्वास ठेवू नका. शंका आल्यास खात्री करावी. cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी.

- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com