
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे ट्रॅक सुरक्षित व सलग नाहीत. त्यावर वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, राडारोडा, विजेचे खांब, डीपी बॉक्स, झाडे, बाके, कठडे, फलक यांसारखे अनेक अडथळे आहेत. अर्बन स्ट्रीट डिझाइन आणि सायकल ट्रॅक केवळ शोभेचे डिझाइन बनले आहेत. परिणामी, ट्रॅकवरून सायकलस्वारांना सायकल चालविता येत नाही. त्यामुळे ते नाराजी व्यक्त करीत आहेत.