Video : पिंपरीतील असंघटित कामगारांना मिळाला सायकलचा आधार  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

- सायकल अवेरनेस, निसर्ग सायकल मित्र यांचा पुढाकार 

पिंपरी : असंघटित कामगारांना कामावर ये-जा करण्यासाठी सायकल अवेअरनेस पुणे, निसर्ग सायकल मित्र, भद्राय राजते प्रतिष्ठान पुणे यासह इतर काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन महिन्यांसाठी डिजिटल लॉक आणि ट्रॅकर सुविधा असलेल्या सायकली पुरविण्यात येणार आहेत. 15 असंघटित कामगारांना सायकलींचे वाटप करून त्याची सुरुवात करण्यात आली. येत्या काळात सुमारे दीड हजार कामगारांना सायकली उपलब्ध करून देण्याचे स्वयंसेवी संस्थांचे उद्दिष्ट आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते घरेलू, सफाई कामगार, बांधकाम आणि कंत्राटी कामगारांना सायकलींचे वितरण करण्यात आले. पालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार, सायकल मेयर पुणे अभिजित कुपटे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, सुनील पाटील, सतेज नाझरे, विनीत पाटील, माधुरी जलमुलवार आदी यावेळी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना कुपटे म्हणाले, "सध्या अनेक लोक कामावर वाहने घेऊन ये-जा करत आहेत. परंतु, ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरता येत नाही, अशा कष्टकरी वर्गातील लोकांनी काय करायचे? म्हणून आम्ही काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दोन महिन्यांसाठी सायकली उपलब्ध करून देण्याबाबत ठरविले आहे. त्यानुसार 15 असंघटित कामगारांना आम्ही सायकलींचे वाटप केले आहे. कामगारांना सायकली वापरण्यासाठी विनामूल्य देण्यात आल्या आहेत. या सायकलींच्या एका महिन्याभराच्या भाड्याचा खर्च खासगी कंपनीने उचलला असून दुसऱ्या महिन्याच्या भाड्याचा खर्च लोकसहभागामधून केला जाणार आहे. संबंधित खासगी कंपनी या सर्व सायकलींची गरजेनुसार देखभाल-दुरुस्ती करणार आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"असंघटित कामगारांसाठी सध्या सक्षम वाहतूक नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सायकली उपलब्ध करून देत आहोत. सायकलींसाठी सुमारे 200 लोकांनी नोंदणी केली असून, पहिल्या टप्प्यात 15 घरेलू, स्वच्छता, सुरक्षारक्षक आदींना सायकली वापरासाठी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 7 महिला आणि 8 पुरुष कामगारांचा समावेश आहे.''
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष कष्टकरी संघर्ष महासंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cycles distribute to unorganized workers at pimpri chinchwad