
पिंपरी : थरांचा थरथराट... पावसाच्या सरी अंगावर घेत गोविंदांचे मानवी मनोरे ...ढोल-ताशांचा गजर, ‘डीजे’च्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई... लाखो रुपयांचे बक्षीसरूपी ‘लोणी’ आणि सिने कलाकारांची हजेरी असे जल्लोषपूर्ण वातावरण शनिवारी (ता.१६) दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या दहीहंडी उत्सवात राजकीय नेत्यांनी गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली.