पिंपरी-चिंचवड : मोशी-वडमुखवाडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचं करायचं काय? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

  • अरुंद रस्त्याची समस्या
  • वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी 

मोशी (पिंपरी-चिंचवड) : राजा शिवछत्रपती चौक ते खडीमशिन, अलंकापुरम सोसायटीमार्गे वडमुडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता अत्यंत अरुद असल्याने येथे वाहतूक कोंडी होणे ही बाब नित्याचीच झाली असून, वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखीच झाली असल्याचे वाहनचालक उमाकांत पवार, रायबा चव्हाण, नितीन यादव, राकेश रोकडे, दिनेश चव्हाण आदींसह स्थानिक नागरिक चंद्रकांत गिलबीले, रोहिदास हवालदार, रुपेश बिराजदार आदींनी ही समस्या व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते खडीमशिन, अलंकापुरम सोसायटीमार्गे वडमुडवाडीकडे एक जुना रस्ता जात आहे. या रस्त्याच्या दुतर्फा सध्या अनेक व्यावसायिकांनी पत्राशेड, दुकाने, हॉटेल आदी व्यवसाय उभारले आहेत. वडमुखवाडी हद्दीत सध्या अलंकापुरमसारख्या अनेक गगनचुंबी इमारती झाल्या असून, त्यामध्ये हजारो नागरिक सध्या राहत आहेत. चऱ्होली, वडमुखवाडी, आळदीकडून पिंपरी-चिंचवडकडे येण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याने दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा रस्ता सध्या अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या या जुन्या रस्त्यालगतच खडी टाकून रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामामुळे तर या वाहतूक कोंडीमुळे आणखीच भर पडली आहे. त्यामुळे शहराकडे येणाऱ्या या मार्गाचे नुसते डागडुजीकरण न करता १८ ते २४ मीटर रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. तशी स्थानिक नागरिकांसह अनेक वाहन चालकांनी या रस्त्याचे १८ ते २४ मीटर रुंदीकरण करण्याची मागणी योगेश खोत, गणेश जाधव, कावेरी बोडखे, रुपाली देशमुख आदींसह या रस्त्याने दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily traffic jam on moshi vadmukhwadi road